फुटबॉल सामन्यानंतर मोटारीने चिरडल्याने चार चाहते जखमी   

ब्रिटनमधील दुर्घटना, २४ हून अधिक जखमी

लिव्हरपूल :  लिव्हरपूल फुटबॉल क्लबने स्पर्धा जिंकल्यानंतर आनंदोत्सव सोमवारी साजरा केला जात होता. तेव्हा एकाने बेदरकारपणे मोटार चालवून मुलासह चौघांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात २४ हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी ५३ वर्षीय चालकाला अटक केली.
 
चाहत्यांना चिरडण्याचा प्रकार एकाच व्यक्तीने केला आहे. दहशतवादी कृत्य नसल्याचे प्रथमदर्शी दिसते. या प्रकरणी संशयिताला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा छडा लावण्यासाठी गुप्तचर कामाला लागले आहेत. लिव्हरपूल क्लबने प्रीमियर लीग चँपयनशीप जिंकल्यानंतर चाहते मेरसे नदीजवळील वॉल्टर रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करत होता. एका खुल्या बसमधून मिरवणूक काढली जात होती. तेव्हा एक वेगवान मोटार चाहत्यांच्या दिशेने आली आणि त्यात घुसली. त्यात चार चाहते गंभीर जखमी झाले. २४ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान  घटनास्थळी चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला होता. आनंदोत्सवाचे रुपांतर भीतीमध्ये झाले. तेथे बाटल्या, कॅन आणि लिव्हरपूल क्लबचे ध्वज पडल्याचे दिसून आले. यानंतर  परिसर पोलिसांनी सीलबंद केला.
 

Related Articles